हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
हा आठवडा अतिउष्ण
उत्तर, पश्चिम, मध्य व उर्वरित राज्यावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. याचाच अर्थ असा की, जेथे हवेचे दाब कमी होत आहेत, तिथे तापमान अधिक, तर जेथे तापमान अधिक त्याठिकाणी तापमानाची तीव्रता थोडी कमी राहील. एकूणच संपूर्ण राज्यात या आठवडयात अधिकतम तापमान राहणे शक्य आहे. २८ व २९ एप्रिलला अधिकतम तापमान असेल. एप्रिलचा शेवटचा आठवडा हा अतिउष्ण आठवडा असतो.
कृषी सल्ला: १. विहीरीचे किंवा बोरचे पाणी तपासून घ्या २. येत्या खरीप हंगामाची पुर्व तयारी करावी ३. येत्या खरीप हंगामात ज्वारी पिकाच्या योग्य जाती निवडा ४. ऊस पिकाच्या शेंडा पोखरणाऱ्या अळीचा वेळीच बंदोबस्त करावा ५. भुईमूग पिकावरील टिक्का रोगाचे वेळीच नियंत्रण करा ६. वाळवीचे नियंत्रण व्यवस्थित करा संदर्भ - जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
25
0
संबंधित लेख