AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
19 May 19, 06:00 PM
पशुपालनगुजरात लाइवस्टॉक डेवलपमेंट बोर्ड (गांधीनगर)
जनावरांमध्ये कृत्रिम रेतनाचे फायदे
उच्च अनुवांशिक गुण असलेल्या वळूचे वैज्ञानिक पद्धतीने वीर्य एकत्रित करून वैज्ञानिक उपकरणाच्या साहाय्याने मादी जनावरामध्ये गर्भधारणा करणे ही प्रक्रिया म्हणजेच कृत्रिम रेतन होय. फायदे • देशामध्ये जनावरांची क्षमता कमी आहे. प्रजनन, अधिक क्षमता व उच्च दर्जाच्या वळूंची संख्या कमी आहे. कृत्रिम गर्भधारण किंवा कृत्रिम रेतन यासाठी वळूंचा उपयोग केला जाऊ शकतो. • गाय व म्हैस यांच्यामधील अनुवांशिक आजारपणाची तपासणी केली जाते. • निरोगी, चांगले वळूंची निवड व वळूंचे नियमित रोग परीक्षण केले जाते. यामुळे प्रजननविषयी रोगांची समस्या उद्भवत नाही. • ५ ते ७ जनावर असलेल्या गोपालकाला वेगळा वळू सांभाळणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे कृत्रिम रेतन पद्धत त्यांना योग्यरीत्या परवडते. • सुधारित जात व अधिक उच्च दर्जाच्या वळूमुळे दुध उत्पादनात जास्त वाढ होते.
• एका वर्षात एक वळूच्या माध्यमातून १०० ते १२० जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करता येते. • जमा केलेले शुक्राणू अनेक दिवस नायट्रोजन वायूमध्ये अनेक दिवस सुरक्षित ठेवले जातात. संदर्भ: गुजरात लाइवस्टॉक डेवलपमेंट बोर्ड (गांधीनगर) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
495
30