AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Aug 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कृषी क्षेत्रातील पिकांमधील कोळीचे व्यवस्थापन
कोळी हा कीटक वर्गातील चार जोडी पाय असणारा कीड आहे. पर्यावरण आणि पीक पद्धतीमध्ये झालेला बदल इत्यादीमुळे कोळीचा प्रादुर्भाव होऊन या कोळींची संख्या वाढत आहे. पिकांच्या नुकसानाव्यतिरिक्त काही प्रजाती शिकारी कोळी म्हणून ओळखल्या जातात. हे मुख्यतः लाल रंगाचे असतात. नुकसानीचा प्रकार: प्रादुर्भाव झालेली पाने हलक्या पिवळ्या रंगाचे डाग, कडक, आकसा, कुरकुरीत आणि शेवटी पाने सुकून गळून जातात. झाडाच्या खराब झालेल्या भागावर जाळी आढळून येते. उष्ण हवामानाने कोळी किडीच्या वाढीस अनुकूलता असून, अशा वातावरणात प्रादुर्भाव वेगाने वाढतो. काही कोळी कीटक विषाणूजन्य रोगांसाठी वाहक म्हणून देखील कार्य करतात. पतंगांचा प्रादुर्भाव मुख्यतः भेंडी, वांगी, मिरची, भात, कापूस, चिकू, आंबा, चहा, वाटाणे, नारळ, ज्वारी इत्यादी पिकांमध्ये होतो.
व्यवस्थापन: • शेतीच्या बांधावर स्वच्छता ठेवावी. • पिकाचे अवशेष व्यवस्थित नष्ट करावे. • शेतीतील तणांचे नियंत्रण करावे. • पिकांची फेरपालट करावी. • शिफारशीनुसार नत्रयुक्त खतांचा वापर करावा. • प्राथमिक अवस्थेत निम आधारित कीटकनाशकाची फवारणी करावी तसेच परभक्षी कोळी आणि मित्र किडींचे संवर्धन करावे. • फिश ऑईल, रेझिन साबण, कडुलिंब आधारित फॉर्म्युलेशन्स आणि निम तेल अशा जैव कीटकनाशकांची फवारणी करावी. • शक्यतो, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेणे टाळावे. • पिकामध्ये प्रादुर्भाव जास्त आढळून आल्यास, प्रॉपरगाईट ५७ ईसी @१० मिली, अबामेक्टिन १.८ ईसी @२ मिली, स्पायरोटेट्रामेट १५० ओडी @२.५ मिली, फेनपायरोक्झिमेट ५ एससी @१० मिली, फेनाक्झाक्विन १० ईसी @१० मिली, इथिऑन ५० ईसी @१० मिली, स्पायरोमेसीफेन २२.९ ईसी @१० मिली यांपैकी कीटकनाशकांची कोळी किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
140
1