कृषी वार्ताकृषी जागरण
कापूस निर्यातीवर कोरोना विषाणुचा परिणाम होणार नाही
कापूस लागवड करणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. भारतीय कापूस संघ म्हणजेच सीएआय यांनी नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सर्वत्र कोरोना विषाणूचा परिणाम झाला असला तरी कापूस उद्योगावर परिणाम होणार नाही. भारतीय कापूस संघाच्या अहवालानुसार, कोरोना विषाणुचा प्रादुर्भावाचा परिणाम कापसाच्या निर्यातीवर होणार नाही. भारतीय कापूस संघाच्या म्हणण्यानुसार, चालू हंगामात कापसाची एकूण निर्यात सुमारे 42 लाख गाठी होईल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर कापूस हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो.
भारतीय कापूस संघाचे (सीएआय) अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भावचा कापूस निर्यातीवर जास्त परिणाम होणार नाही. कारण मागील वर्षी 2019 मध्ये कापसाची जास्त निर्यात केली नाही. गेल्या वर्षी केवळ 8 लाख कापसाठी गाठी चीनमध्ये निर्यात झाली होती. फेब्रुवारी २०२० च्या अखेरी संघाने जवळपास ६ लाख कापसाच्या गाठी निर्यात केल्या आहेत. त्याचबरोबर बांग्लादेशसोबत इतर बाजारपेठांकडून कापसाची मागणी वाढली आहे. याप्रकारे व्हिएतनाम व इंडोनिशियाला ५-५ लाख कापसाची निर्यात केली आहे. चालू सत्रामध्ये कापूस संघाजवळ ६ महिन्याचा वेळ असल्याने कापूस निर्यातीचे ध्येय लवकरच पूर्ण होईल अशी भावना कापूस संघाच्या अध्यक्ष यांनी व्यक्त केली. संदर्भ – कृषी जागरण, १३ मार्च २०२० ही महत्वपूर्ण बातमी लाइक करा व आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
46
0
संबंधित लेख