AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Sep 19, 01:00 PM
कृषि वार्तापुढारी
आता, भेंडी लाल–जांभळी मिळणार!
वाराणसी – उत्तर प्रदेशात वारणसी येथीस ‘इंडिन इन्स्टिटयूट ऑफ व्हेजिटेबल’ रिसर्च म्हणजेच ‘आयआयव्हीआर’ने आता लाल जांबळ्या रंगाच्या भेंडीची प्रजाती विकसित केली आहे. 23 वर्षाच्या कठोर मेहनतीनंतर आता या संस्थेला याबाबत यश मिळाले आहे. या नव्या प्रजातीला ‘काशी लालीमा’ असे नाव देण्यात आले आहे. लाल रंगाची ही भेंडी अँटी ऑक्सिडंट, लोह व कॅल्शियमसह अनेक पोषक घटकांनी युक्त आहे. लाल रंगाची भेंडी आतापर्यंत केवळ पाश्चिमात्य देशांमध्येच पाहायला मिळत होती. भारतात तिकडूनच अशी भेंडी आयात केली जात असे. तिच्या वेगवेगळया प्रजातींची किंमत 100 ते 500 रू. प्रतिकिलो इतकी आहे. आता भारतीय शेतकरीही लवकरच तिचे उत्पादन घेऊ शकतील. डिसेंबरपासून संस्थेमध्ये या भेंडीचे बीज शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
पोषक घटक असलेल्या या भेंडीच्या उत्पादनाचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना तर मिळेलच, पण ग्राहकांनाही या भेंडीच्या सेवनाने आरोग्य लाभ मिळेल. संस्थेचे माजी संचालक डॉ. बीजेंद्र यांच्या नेतृत्वाखाली लाल भेंडीच्या प्रजातीवर 1995-96 मध्ये काम सुरू करण्यात आले होते. या संशोधनात डॉ. एस.के.सानवाल, डॉ. जी. पी. मिश्रा व तंत्रज्ञान सहायक सुभाष चंद्र यांनी योगदान दिले. या भेंडीची लांबी 11 ते 14 सेंटीमीटर व व्यास 1.5 ते 1.6 सेंटीमीटर आहे. संदर्भ – पुढारी, 22 सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
410
1