AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Apr 19, 07:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
ऊस व साखर उदयोगाला ठरणार उपयुक्तमहाराष्ट्र साखर उत्पादनात अग्रेसर
कोल्हापूर: ऊस पिकाखालील क्षेत्र, उसाची उत्पादकता, उसाचे उत्पन्न, साखरेचे उत्पन्न, उभ्या उसावरील रोग- किडीची अवस्था याबाबत अचूक निदान करण्याचे उच्च रेझोल्यूशन आधारित अद्यावत तंत्रज्ञान ‘आयबीएम’ या संगणक उद्योगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘द वेदर कंपनी'सोबत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या स्तरावरून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. त्याआधारे `हवामान अंदाज सूत्र' निश्चित होण्यात यश आल्यास ते भारतीय ऊस व साखर उदयोगाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.
‘‘२५ मार्चपर्यंत देशात जवळपास २८८.२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक १०३.६० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशाचा क्रमांक असून तेथे ९०.६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. चालू साखर वर्षात देशभरात ३२४ लाख टन साखरेचे उत्पादन होईल,’’ असा अंदाजही नाईकनवरे व्यक्त केला. संदर्भ – अॅग्रोवन, ६ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0