AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Jun 19, 06:00 PM
जैविक शेतीझिरो बजेट शेती (सुभाष पाळेकर)
बिजामृत ‘असे’ तयार करावे
बिजामृत ही एक बियाणे व रोपावरील मुळांचे बुरशी आणि मातीमधील रोग यापासून संरक्षण करण्यासाठी केलेली जैविक बीज प्रक्रिया आहे. पावसाच्या काळामध्ये पीक व मुळांवर बुरशीजन्य रोगाचा परिणाम होतो, त्यावेळी बिजामृत हे उपयोगी पडते. साहित्य - २० लिटर पाणी, ५ किलो गाईचे शेण, ५ लिटर गोमुत्र, ५० ग्रॅम चुना व मुठभर शेतीच्या बांधावरील माती
बिजामृत तयार करण्याची पद्धत – • ५ किलो देशी गाईचे शेण कापडामध्ये बांधून २० लिटर पाण्यामध्ये १२ तास अडकून ठेवावे. • १ लिटर पाण्यामध्ये ५० ग्रॅम चुना मिसळून रात्रभर भिजत ठेवा. • दुसऱ्या दिवशी सकाळी कापडामधील बांधलेले शेण व्यवस्थित पाण्यामध्ये पिळून घ्यावे. • यामध्ये मुठभर माती मिसळून पाण्याचे द्रावण हलवून घ्यावे. • यानंतर पाण्यामध्ये ५ लिटर गाईचे गोमुत्र व चुन्याचे द्रावण एकत्र मिसळून द्रावण चांगले ढवळून घ्यावे. बिजामृत वापरण्याची पद्धत – बिजामृतामध्ये कोणत्याही पिकाचे बियाणे हाताने व्यवस्थित मिसळून व बियाणे सुकविल्यानंतर पेरणी करावी. संदर्भ – झिरो बजेट शेती (सुभाष पाळेकर) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
817
0