हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात थंडी कमी-जास्त प्रमाणात
महाराष्ट्राच्या सहयाद्री पर्वतरांगापासून पूर्वेस १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मागील आठवडयापेक्षा या आठवडयात थंडीचे प्रमाण कमी होईल, मात्र पहाटे थंडी जाणवेल व दुपारी ही थंड हवामान राहील. कारण हवेचे दाब कमी होत असल्यामुळे किमान व कमाल तापमानात थोडया प्रमाणात वाढ होण्यास सुरूवात होत आहे. १२ व १३ जानेवारीला ही स्थिती कायम राहील, मात्र १४ जानेवारीला हवेच्या दाबात पुन्हा वाढ होईल त्यामुळे थंडीचे प्रमाण पुन्हा वाढेल.
कृषी सल्ला:_x000D_ १. ऊसाची लागवड करावी - या पिकाची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. लागवडीपूर्वी एक नांगराची पाळी देऊन जमिनीची पूर्व मशागत करावी._x000D_ २. भेंडी लागवड फायदयाची - फुले उत्कर्षा, अर्का अनामिका,विमुक्ता,अर्का अभय या भेंडी पिकाच्या उत्तम जाती आहेत. या पिकाची लागवड जानेवारीच्या १५ तारखेनंतर करावी._x000D_ ३. वालाची लागवड फायदयाची – फुले गौरी, अश्र्वणी या उंच वाढणाऱ्या जाती असून, लागवड ताटी पध्दतीने करावी. फुले सुरूची व कोकण भूषण या बुटक्या जात आहेत. _x000D_ ४. कार्ली लागवड फायदयाची – फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी या उत्तम जाती आहेत. सद्या या जातीचे वाण नवनवीन कंपन्यांनी बाजारात आणले आहेत. या पिकाची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी._x000D_ ५. काकडीची लागवड फायदयाची – हिमांगी फुले व शुभांगी या विदयापीठांच्या जाती उत्तम आहेत. या पिकाशिवाय अनेक कंपन्यांच्या विविध जाती बाजारात आहेत._x000D_ ६. उन्हाळी हंगामातील भूईमूग लागवड दुहेरी फायदयासाठी – या पिकाच्या लागवडीपूर्वी हेक्टरी २० ते २५ बैलगाडया शेण खत घालावे व ते कुळवाच्या पाळीने जमिनीत मिसळावे. दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ठेवून बियांची पेरणी करावी._x000D_ _x000D_ संदर्भ – ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे _x000D_ _x000D_
5
0
संबंधित लेख