AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 May 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आंब्याच्या पानावरील जाळीचा प्रादुर्भाव
आंब्याच्या पानावरील जाळीचा प्रादुर्भाव हा मागील २०-२५ वर्षापासून आढळून येत आहे. या जाळीमुळे कधी ही नुकसान झाले नाही. मात्र गुजरातमधील सौराष्ट्र भागात या जाळीमुळे पहिल्यांदा आंबा फळांचे आणि पानांचे नुकसान झाले आहे. यानंतर हा प्रादुर्भाव शेजारील राज्यातदेखील प्रसारित झाला. सामान्यत: या किडीचा प्रादुर्भाव एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असते. नुकसान – प्राथमिक अवस्थेत अळी पानामधील आतील भाग खाऊन पानामध्ये जाळे तयार करते. या किडीने यावर्षी आंब्याच्या फळामधील आतील भाग खाल्ल्याने फळगळची समस्या निर्माण झाली. या समस्येमुळे फळांची गुणवत्ता घसरते व फळ खाण्यास अयोग्य ठरतात.
एकात्मिक व्यवस्थापन – • झाडावरून गळून पडलेली व खराब झालेली फळे गोळा करून वेळोवेळी नष्ट करावीत. • नुकसान झालेल्या फांद्या, शेंडे व अळीने तयार केलेली जाळी काढून नष्ट करावीत. • वेळोवेळी झाडांची छाटणी करावी यामुळे बागेमध्ये हवा खेळती राहते. • एप्रिल ते नोव्हेंबरच्या दरम्यान प्रकाश सापळे बागेमध्ये लावावेत. • बिवेरीया बसियाना ४० ग्रॅम प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी किंवा निमार्क ५% @ ४० मिली प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी. • जर जास्त प्रादुर्भाव वाढल्यास, प्रोफेनोफॉस ५० ईसी @१० मिली किंवा नोवाल्युरोन १० ईसी @ लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी @ १० लि. पाण्यात फवारणी करावी. • आंबा जर काढणीच्या अवस्थेत आला असेल, तर कीटकनाशकच्या अवशेषचा प्रभाव बघूनच आंब्यावर फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
195
13