कृषि वार्तासकाळ
आता, केंद्रातर्फ पशूंच्या संपूर्ण लसीकरणाचा खर्च केला जाईल
नवी दिल्ली- सरकार स्थापनेनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, लाळया-खुरकुत्यासारख्या जीवघेण्या रोगांपासून सर्व पाळीव पशूंची मुक्तता करण्यासाठी पशूंच्या लसीकरणाची योजना केंद्र सरकारतर्फे राबविली जाणार आहे.
याआधी लसीकरणासाठी ४० टक्के अर्थसहाय्य राज्यांचे होते. आता संपूर्ण खर्च केंद्रातर्फे केला जाईल. पाच वर्षात ३० कोटी गाई-बैल, २० कोटी शेळया-मेंढया आणि एक कोटी वराहांचे लसीकरण केली जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली. संदर्भ – सकाळ, १ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
63
0
संबंधित लेख