कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शेतकऱ्यांसाठी पीक विमा माहिती स्थानिक भाषेमध्ये पाहिजे
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (इराडा) ने सांगितले की, विमा कंपनी सुनिश्चित करा व सर्व कॉल सेंटर / टोल-फ्री नंबरवरील प्रतिक्रिया हिंदी व इंग्रजी भाषा व्यतिरिक्त स्थानिक भाषांमध्येही उपलब्ध झाले पाहिजे.
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (इराडा) ने सांगितले की, विमा कंपनी सुनिश्चित करा व सर्व कॉल सेंटर / टोल-फ्री नंबरवरील प्रतिक्रिया हिंदी व इंग्रजी भाषा व्यतिरिक्त स्थानिक भाषांमध्येही उपलब्ध झाले पाहिजे. त्याचबरोबर विमा कंपनीच्या वेबसाइटवरदेखील शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा विषयीची माहिती स्थानिक भाषेमध्येदेखील असली पाहिजे. पीक विमा कंपनींना शेतकऱ्यांना हिंदी व इंग्रजी भाषा व्यतिरिक्त स्थानिक भाषांमध्ये पीक विमा कायदयाबाबत माहिती दिले पाहिजे. तसेच पीक विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक कायदयासंबंधी विविध तक्रारींवर उपाय मिळणे ही आवश्यक आहे. शेतक-यांना योजनेच्या दिशानिर्देश, कायदेशीर प्रक्रिया आणि तक्रार निवारण प्रक्रियाविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विमा कंपनींनी एखादया व्यक्तीच्या वैयक्तिक नुकसानबाबतचे मूल्यांकन रद्द केले तर लिखित अस्वीकृती पत्र विमाधारकांना पाठविलेले गेले पाहिजे असल्याचे भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (इराडा) यांनी स्पष्ट केले आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २६ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
174
0
संबंधित लेख