AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Mar 19, 06:00 PM
पशुपालनअॅग्रोवन
प्रक्रिया केलेला चारा खाऊ घालताना ‘अशी’ काळजी घ्या
प्रत्येक तंत्रज्ञान वापरताना योग्य रीतीने न वापरल्यास त्याचे काही तोटे होऊ शकतात म्हणून प्रक्रिया केलेला चारा व मुरघास खाऊ घालताना खालील प्रमाणे काळजी घ्यावी. १. प्रक्रिया केलेला चारा व मुरघास अचानक न देता रोजच्या चाऱ्यात मिसळून हळूहळू प्रमाण वाढवावे. ते ५ ते ७ दिवसांनी पूर्ण प्रमाणात घालण्यास सुरवात करावी. २. बुरशी किंवा रंग काळपट झाला असल्यास जनावरांना खाऊ घालू नये. ३. मुरघास एकदा उघडल्यावर तो संपेपर्यंत त्यातील कमीत कमी अर्धा ते एक फुट वरचा थर रोज खाऊ घालावाच. ४. युरिया प्रक्रिया केलेला चारा खाऊ घालण्यापूर्वी थोडावेळ पसरवून ठेवून त्यातील अमोनियाचा वास जाऊ द्यावा.
५.प्रक्रिया केलेला चारा व मुरघास काढल्यावर पुन्हा व्यवस्थित झाकून ठेवावा, जेणेकरून त्यात इतर कीटक किंवा विषारी प्राणी जाणार नाहीत. ६ सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांची रवंथ करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते त्यामुळे त्यांना प्रक्रिया केलेला चारा व मुरघास खाऊ घालू नये. संदर्भ- अॅग्रोवन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
454
0