मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात थंड व कोरडे हवामान
राज्यात या आठवडयात हवामान पोषक आहे. मात्र यापुढे जेव्हा तापमान ८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होईल, त्यावेळी पिकांची, जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण निचांकी तापमान अपायकारक असते. धुळे, नाशिक, नंदुरबार, मालेगाव, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद, पुणे या जिल्हयात या आठवडयात किमान तापमान ८ अंश सेल्शिअसपेक्षा कमी होणे शक्य आहे. सकाळी राज्याच्या उत्तर व मध्य भागात तसेच मराठवाडयात धुक्याचे प्रमाण अधिक राहील. मात्र दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. या आठवडयात हवामान काही जिल्हयात अल्पशा प्रमाणात ढगाळ राहील. मात्र पावसाची शक्यता नाही. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात घसरण होईल.
कृषी सल्ला १. जेव्हा तापमान ८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल, तेव्हा फळबागामध्ये पहाटे शेकोटया पेटवणे, उभ्या पिकांना सायंकाळी पाणी देणे तसेच जनावरांच्या गोठयांना झाप बांधून थंडीपासून संरक्षण करावे. २. ऊन्हाळी हंगामात लागवड करण्यासाठी जमिनीची पुर्वमशागत करून जमिनी लागवडीसाठी तयार कराव्यात. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
39
0
संबंधित लेख