AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jun 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
अन्नधान्य उत्पादन २८.३३ करोड टन होण्याचा अंदाज
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, चालू हंगाम २०१८-१९ च्या तिसऱ्या आरंभिक अंदाजानुसार एकूण अन्नधान्याचे उत्पादन २८.३३ टन होण्याचा अंदाज वर्तविला आहे, जो दुसऱ्या आरंभिक अंदाज २७.७४ कोटी टनपेक्षा जास्त आहे. चालू हंगाममध्ये तांदळाच्या उत्पादनात वाढ होऊन ११.५६ टन होण्याचा अंदाज आहे. जे दुसऱ्या आरंभिक अंदाजानुसार बरोबर आहे. गहूचे उत्पादन चालू रबीमध्ये विक्रमी १०.१२ कोटी टन होण्याचा अंदाज आहे, जेणेकरून दुस-या आरंभिक अंदाजानुसार गहूचे उत्पादन ९.९१ कोटी टन होण्याचा अंदाज आहे.
डाळवर्गीय चालू पीक हंगाम २०१८-१९ च्या तिसऱ्या आरंभिक अंदाजानुसार उत्पादन २३२.२ लाख टन होण्याचा अंदाज आहे. मक्काचे उत्पादन २७८.२ लाख टन होण्याचा अंदाज आहे. चालू पीक हंगामात हरभरा उत्पादन १००.९ लाख टन आणि तूरचे उत्पादन ३५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. तेलवर्गीयमध्ये सोयाबीनचे उत्पादन तिसरे आरंभिक अंदाजानुसार १३७.४ लाख टन आणि मोहरीचे ८७.८ लाख टन होण्याचा अंदाज आहे. भुईमूगचे उत्पादन ६५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. कापसाचे उत्पादन २७५.९ लाख टन होण्याचा अंदाज आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ३ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
31
0