AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 May 19, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन
१. पतंगावर पकडण्यासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा. २. कामगंध सापळे लावताना पिकांच्या उंची बरोबर लावावेत. ३. ट्रायकोग्रामा प्रजाती, टेलेमोनसरेमल या परोपजीवी कीटकांचे एकरी ५० हजार अंडी याप्रमाणे शेतीमध्ये सोडावे. यानंतर ४ ते ५ दिवसापर्यंत कोणतीही रासायनिक कीटकनाशकची फवारणी करू नये. ४. मक्याची लवकर पक्व होणाऱ्या वाणाची निवड करावी.
५. मका पिकाची वेळेवर पेरणी करून वेळेवर काढणी करावी. ६. उन्हाळी पीक न घेता २–३ वर्षातून एकदा खोल नांगरट करावी. ७. जैविक कीटकनाशकचा सुयोग्य वापर करून या किडीचा माक्यावरील प्रादुर्भाव कमी करता येतो. बॅसिलस थुरजेनेसिस किंवा मेटारायझिम अनोस्पोली याचा वापर प्रादुर्भाव होण्याच्या वेळी केल्यास प्रभावी नियंत्रण मिळते. संदर्भ –अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
203
24