जैविक शेतीhttp://agritech.tnau.ac.in
भात पिकामध्ये अॅझोलाचे महत्व
अॅझोला जैविक खत असून वातावरणातील मुक्त नायट्रोजन शोषून वनस्पतीच्या पानांमध्ये साठवते, म्हणून ते हिरवळीच्या खतासारखे वापरले जाते. भातशेतीमध्ये अॅझोला तांदूळ उत्पादन २०% ने वाढवते. अॅझोलामध्ये पौष्टिक मूल्य - प्रथिने (२५ - ३५%), कॅल्शियम (६७ मिलीग्रॅम / १०० ग्रॅम) आणि लोह (७.३ मिलीग्रॅम / १०० ग्रॅम) याप्रमाणत उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. अॅझोलाचे फायदे १. ते जंगलात सहज वाढते आणि नियंत्रित परिस्थितीत देखील वाढू शकते. २. खरीप आणि रब्बी या दोन हंगामामध्ये - आवश्यकतेनुसार मोठ्या प्रमाणावर हिरवळीच्या खताप्रमाणे सहजपणे तयार करता येते. ३. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजनचे क्रमशः कार्बोहायड्रेट्स व अमोनिया मध्ये रूपांतर करून, विघटनानंतर ते पिकास शोषून घेण्यासाठी नायट्रोजन आणि सेंद्रियकर्ब ही अन्नद्रव्ये मातीमध्ये उपलब्ध करून देते. ४. ऑक्सिजनिक प्रकाश संश्लेषणामुळे तयार होणारी ऑक्सिजन पिके मूळ प्रणाली श्वसन तसेच इतर मातीतील सूक्ष्मजीवांना सक्षम करते. ५. पिकांना जमिनीतील झिंक, लोह आणि मँगॅनीज या अन्नद्रव्यांना शोषून घेण्यासाठी चालना देतात. ६. भात पिकात येणाऱ्या तणांच्या वाढीस प्रतिबंध करते. ७. अॅझोला हे वाढ नियंत्रक आणि जीवनसत्व युक्त असल्याने, भात पिकाच्या वाढीमध्ये सुधारणे करते. ८. अॅझोला काही प्रमाणात रासायनिक नायट्रोजन खतांसाठी (२० कि.ग्रॅ/ हेक्टर) पर्यायी असल्याने पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढते. ९. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यास वापरले जाते. १०. भात पिकातील बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. संदर्भ - : http://agritech.tnau.ac.in
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
249
0
संबंधित लेख