कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
केंद्र सरकार करणार कृषी क्षेत्रात बदल
केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात व्यवहार्य बदल आणण्यासाठी काय उपाय केले पाहिजे यासाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीव्दारा या समितीचे संयोजक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. समिती अधिसूचना जाहीर झाल्यानंतर दोन महिन्यात अहवाल सादर केला जाईल. समिती निती आयोगमध्ये कृषी मुद्दे पाहणारे सदस्य रमेश चंद बतौर व सदस्य सचिव सहभागी होतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ व कृषी मंत्री नरेंद्र तोमर या समितीचे सदस्य असतील. मागील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. समिती कृषी क्षेत्रात बदलाव आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मुद्दयावर विचार केला जाईल आणि राज्याद्वारा वेळेनुसार सुधारणा लागू करण्यासदेखील सुचवले जाणार आहे. समिती आवश्यक वस्तू अधिनियम (ईसीए) १९५५ च्या विविध तुरतुदींचा आढावा घेईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अधिक गुणवत्ता असणारे बियाणे, कृषी उपकरण आदिची उपलब्धता सुनिश्चित करण्यावरदेखील भर देण्यात येणार आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
55
0
संबंधित लेख