AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Feb 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमुगवरील रसशोषक किडींचे नियंत्रण
गुजरात व इतर राज्यांमध्ये उन्हाळी हंगामात शेतकरी भुईमुग पीक घेतात. मावा ,तुडतुडे, थ्रिप्स व रसशोषक कीड यांसारखे कीड पिकांवर दिसून येतात. हे कीड या पिकांमधील रस शोषून पिकांना नुकसान करतात. या पिकांच्या फुलोरा अवस्थेच्या टप्प्यात उपद्रव झाल्यास नुकसान जास्त होते. एकात्मिक व्यवस्थापन • किडींच्या प्राथमिक अवस्थेत निम आधारित कीटकनाशकाची फवारणी करावी. • बुरशी आधारित व्हर्टीसिलीअम लेकानी @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. • शेतीमध्ये पिवळे चिकट सापळे स्थापित करा. • माव्याचा प्रादुर्भाव जास्त असेल, तर इमाडाक्लोप्रिड १७.८ एसएल @ ५ मिली १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
• तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसत असल्यास इमाडाक्लोप्रिड १७.८ एसएल @ ५ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १० इसी@ ५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ इसी @ २० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. • जर थ्रीप्सचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत असेल, तर लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १० इसी@ ५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ इसी @ २० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
418
47