AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Oct 19, 06:00 PM
मान्सून समाचारअॅग्रोवन
मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे – आज मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर कोकण, मराठवाडयातही मेघगर्जना व विजासहित वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम राजस्थानमध्ये आजपासून हवामान कोरडे होणार असून, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर साधारणत: २० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मान्सून परतण्याचे संकेत आहेत. दरम्यान राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडयातील बीड, उस्मानाबाद जिल्हयासह राज्यात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आहे, तर विदर्भातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ७ ऑक्टोबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
64
0