AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Aug 19, 06:30 PM
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब पिकामधील सूत्रकृमीचे जैविक नियंत्रण
सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व पिकामध्ये एक महत्वाची समस्या म्हणजे सूत्रकृमी आहे. सतत ओलावा असलेल्या पिकांच्या मुळांवर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव सर्व भागात वाढत असल्याचे आढळून येत आहे. सूत्रकृमी सूक्ष्म आकाराची असते व ती पिकाच्या लहान मुळांच्या अंर्तभागात राहून मुळातील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे मुळांवर गाठी निर्माण होऊन मुळांच्या पाणी आणि अन्नशोषणाच्या क्रियेवर परिणाम होतो. झाडांची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. शिवाय सूत्रकृमीने इजा केल्यामुळे अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडे वाळतात आणि मर रोगाची लक्षणे दिसतात. सूत्रकृमी नियंत्रणासाठी खालील जैविक व्यवस्थापन करावे. • नवीन बाग लागवड करताना, पीक लागवडीपूर्वी जमीन ऊन्हामध्ये तापू द्यावी, त्यामुळे जमिनीतील सूत्रकृमीचे नियंत्रण होण्यास मदत होते. • डाळिंबामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, काकडी इ. आंतरपिके घेऊ नये. • पीक लागवडीनंतर, पिकाच्या चोहोबाजूने गावठी झेंडूची लागवड करावी. • निंबोळी पेंड प्रति झाड २ ते ३ किलो याप्रमाणे खोडाभोवती जमिनीत खोलवर मिसळावी. • शेणखतासोबत ट्रायकोडर्माप्लस जमिनीतून द्यावे. सातत्याने याचा उपाय करणे गरजेचे आहे. • पॅसिलोमायसिस लिलॅसिनस @ २ ते ४ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. संदर्भ - अॅग्रोस्टार ऍग्रोनॉमि सेंटर ऑफ एक्ससिल्लेन्स
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
334
32