Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Apr 18, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
क्षारपड जमीन सुधारणेसाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात
क्षारपड जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षाराचा पांढरा थर येतो या जमिनीचा सामू ८.५ पेक्षा कमी असतो जमिनीतील विद्राव्य क्षाराची विद्युत वाहकता चार डेसी सायमन प्रती मीटरपेक्षा जास्त असते. विनिमय युक्त सोडियम प्रमाण १५ %जास्त नसते. क्षारपड जमीन सुधारणेसाठी जमिनींची योग्य मशागत करून एक टक्का उतार द्यावा शेती उताराच्या आडव्या दिशेने योग्य अंतरावर चार करावेत. शेतीला पुरेसे पाणी देऊन क्षाराचा निचरा चाराद्वारे शेतीबाहेर काढावा.पिकाच्या फेरपालटीत हिरवळीची पिके घ्यावीत.क्षार सहनशील पिके घ्यावीत ओलिताखालील शेत पडीक ठेवू नये जमीन नेहमी लागवडीखाली ठेवावी.अन्यथा जमीन अधिक क्षारयुक्त होईल जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा.
क्षारपड जमिनीच्या सुधारणेसाठी सच्छिद्र पाईप निचरा प्रणालीचा वापर करावा. या पद्धतीमुळे जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते.जमिनीचा पोत सुधारतो व पाणी मुरण्याचा वेग वाढतो पिकाच्या कार्यक्षम मुलांची वाढ होते.पिक जोमदार येते जमिनीवर क्षार साठवण्याची क्रिया मंदावून जमीन लागवडी योग्य होते. अग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस १४ एप्रिल १८
39
1