Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Oct 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
टोमॅटोचे दोन संकरित वाण तयार
बंगळूर – भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था (आईआईएचआर), बंगळूर येथे टोमॅटोची दोन संकरित वाण विकसित केले आहे. विशेष करून प्रक्रिया उदयोगासाठी तयार केलेले संकरित टोमॅटो, अर्का एपेक्शा व अर्का व्यंजन रोग प्रतिरोधी आहे.
आईआईएचआरच्या संशोधक पथकाचे नेतृत्व करणारे ए.टी सदाशिव यांच्या मते, प्रक्रिया उदयोगासाठी टोमॅटोची संकरित वाण पहिल्यांदाच विकसित केले आहे. या वाणने ५० टन प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते. जर ठिबक सिंचनने पाणी दिले, तर १०० टन प्रति हेक्टरपर्यंत पीक मिळण्याची शक्यता आहे. संकरित टोमॅटो ४० टन प्रति हेक्टर न्यूनतम उत्पादन देतात. अधिक उत्पादनामुळे, खर्चदेखील कमी होतो. याव्यतिरिक्त नवीन संकरित टोमॅटो हे लिप कर्ल वायरस, जिवाणूजन्य मर, लवकर येणारा करपा यांसारख्या रोगांसाठी प्रतिरोधी आहे, जे शेतकऱ्यांच्या पिकावर फवारणी करण्याची संख्या कमी कऱण्यास मदत करते. यामध्ये विद्रव्य पदार्थ १० टक्क्यापेक्षा अधिक आहे. यासोबतच लाइकोपीन जे टोमॅटोला रंग देतात, ते संकरितमुळे जवळजवळ २५ ते ३० टक्के अधिक आहे. संदर्भ – कृषी जागरण, २८ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
433
1