Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Nov 19, 01:00 PM
कृषी वार्तालोकमत
कांदयाचे भाव नियंत्रणासाठी 1 लाख टन विदेशी कांदा करणार आयात
नवी दिल्ली – कांदयाचे वाढते भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सगळया राज्यांकडून व्हिडीओ कॉन्फरन्ससिंगद्वारे कांदयाची परिस्थिती समजून घेतली. परदेशांतून 1 लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्राने एमएमटीसीला परवानगी दिली. एमएमटीसी दुबई व इतर देशांतून तो आयात करतील. कांदयाबद्दल मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी शुक्रवारी ग्राहक सचिव अविनाश श्रीवास्तव यांच्याशी चर्चा करून भाव नियंत्रित करण्यासाठी सर्व उपाय सांगितले.
भाव नियंत्रित करण्यासाठी कांदा आयातीसाठी चार तुकडया दुबई व इतर देशांत आयातीसाठी रवाना, 12 नोव्हेंबरपर्यंत नेदरलॅंड व इजिप्तकडून 2500 टन कांदा दिल्लीतील मंडयांत पोहोचेल, राजस्थानने म्हटले की, नवा कांदा शेतीतून बाहेर काढण्यास जवळपास 10 दिवस लागतील. त्यानंतर मंडयांमध्ये 20 ते 25 तारखेपासून राजस्थानचा कांदा येऊ लागेल, कर्नाटकातही ग्राहक मंत्रालयाने कांदयाची आवक करण्यासाठी टिम्स पाठविल्या आहेत. तेथे आठवडाभर कांदा येऊ लागेल, मंडयांमध्ये कांदयाची आवक वाढली की त्याचे भाव नियंत्रणात येतील. केंद्रीय ग्राहक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नाफेडने आदेश दिले की त्यांनी राज्यांच्या मागणीनुसार रोज 300 टन कांदा पाठवावा. संदर्भ – लोकमत, 11 नोव्हेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
90
0