Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Aug 18, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाताच्या रोपवाटिकेपासून करा खोडकिडीचे नियंत्रण
भातामधील खोडकीड कोष वनस्पतीमधील आतील भाग खातात परिणामी झाड सुकून जाते.त्यालाच आपण मर म्हणतो. खराब झालेले शेंडे सहज बाहेर ओढून काढता येतात. एकात्मिक व्यवस्थापन - • नर्मदा, जीआर 102, आयआर 22, आयआर 66, गुर्जारी, जीआर 12 यासारख्या कमी संवेदनाक्षम जातींची लागवड करा. • जुलैच्या पहिल्या पंधरवडयात लवकर रोपांची लागण करावी. • खते ३-४ वेळा विभागून द्यावे. अतिरिक्त नत्रयुक्त खतांच्या मात्रेमुळे किडींची कार्यशीलता वाढते. • बी पेरल्यानंतर १५ दिवसांनी नर्सरीमध्ये कार्बोफ्युराण 3 टक्के किंवा कार्टप हायड्रोक्लोराईड 4 टक्के जी किंवा फिप्रोनील 0.3 टक्के जीआर किंवा फोरेट 10 टक्के जी @ 1 किलो प्रति 100 चौ.मी. लागू करा. (एक गुंठा ) वाळू सह द्यावे.
• रोपांच्या लागणीच्या वेळी रोपांची वरची शेंडे कापावी. • खोडात कीड राहत असल्याने दाणेदार किटकनाशके अधिक प्रभावी असतात. • क्लोरंट्रिनिलिप्रोल 0.4 टक्के जीआर 10 किलो किंवा कार्टप हायड्रोक्लोराईड 4 टक्के जी @ 10 किलो किंवा क्लोरंट्रिनिलिप्रोल 0.5 टक्के +थायोमिथोक्झाम 1 टक्के जीआर @ 6 कि.ग्रा. किंवा कार्बोफ्युरॉन 3 टक्के जी 20-25 किलो किंवा फिप्रोनील 0.3 टक्के जीआर @ 20-25 किलो प्रतिहेक्टर किडींच्या प्रथमावस्थेत किंवा लागवडी नंतर 30-35 दिवसांनी आणि दुसरी मात्रा पहिली मात्रा दिल्याच्या 15-20 दिवसानंतर द्यावी. • प्रादुर्भाव ग्रस्त भागातच कीटकनाशके वापरा. • याव्यतिरिक्त, अॅसिफेट 75 टक्के एसपी @ 10 ग्राम किंवा क्लोरंट्रिनिलिप्रोल 18.5 टक्के एससी @ 3 मि.ली. किंवा फ्लुबॅंडिअमियाड 48 टक्के एससी @ 3 मिली किंवा फिप्रोनिल 80 टक्के डब्ल्यू.जी.1 ग्रॅम किंवा क्लोरोपीरिफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
142
12