Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Feb 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
जानेवारीपर्यंत साखरेचे उत्पादन ८.१५ टक्के जास्त
चालू पेरणी हंगामात २०१८-१९ (ऑक्टोबर ते सप्टेंबर) पहिल्या चार महिन्यांमध्ये साखरेचे उत्पादन ८.१५ टक्क्यांनी वाढून १८५.१९ लाख टन झाले आहे. जे मागील वर्षी पेरणी हंगामात १७१.२३ लाख टनचे उत्पादन झाले होते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) नुसार या हंगामात साखर कारखान्यांनी ऊसाची पेरणी पहिल्यापासूनच सुरू केली होती. ज्यामुळे आतापर्यंत उत्पादन मागील वर्षापेक्षा जास्त झाले आहे, पण एकूण उत्पादन मागील वर्षी ३२५ लाख टनमधून ५ ते ६ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे. इस्मा के अनुसार चालू पेरणी हंगामामध्ये साखरेच्या एकूण उत्पादनात घट होऊन ३०७ लाख टन होण्याचा अंदाज आहे.
मुख्य उत्पादक असलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ३१ जानेवारीपर्यंत साखरेचे उत्पादन १२.०७ टक्क्यांनी वाढून ७०.७० लाख टन झाले आहे. तथापि, उत्तर प्रदेशमध्ये चालू पेरणी हंगाम ५३.३६ लाख टन एवढे उत्पादन झाले आहे. जे की मागील वर्षी पेरणी हंगामाच्या तुलनेत ५३.९८ लाख टनने थोडे कमी आहे. चालू पेरणी हंगामामध्ये राज्यात ऊसामध्ये उतारा मागील वर्षाच्या तुलनेत ०.८१ टक्के जास्त आहे. कर्नाटकमध्ये चालू पेरणी हंगामामध्ये ३१ जानेवारीपर्यंत साखरेचे उत्पादन २४.७१ टक्क्यांनी वाढ होऊन ३३.४० लाख टन झाले आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ५ फ्रेबुवारी २०१९
3
0