Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Nov 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
आता, काडीकचरा जाळण्यापासून मुक्त व्हा!
नवी दिल्ली – भारतीय कृषी अनुसंधान संस्था (आईएआरआई) पूसाच्या वैज्ञानिकांनी काडी कचरा जाळण्याची मोठी समस्या दूर केली आहे. हा खर्च अत्यंत कमी असल्याने, प्रत्येक शेतकऱ्याला हे आता सहज शक्य आहे. कारण हा काडीकचरा जाळण्यासाठी आता एका छोटया कॅप्सूलच्या स्वरूपात आले आहे, ज्याची किंमत फक्त ५ रू. आहे.
हो, एक एकर शेतीमधील काडीकचरा खताच्या स्वरूपात बदलण्यासाठी आपल्याला केवळ चार कॅप्सूलची आवश्यकता पडेल. आपल्या क्षेत्रातील जमिनीनुसार आपण याची खरेदी करून, उपयोग करू शकतात. मात्र हे कॅप्सूल खरेदी करण्यासाठी पूसा (नवी दिल्ली) ला यावे लागेल. पूसामध्ये मायक्रोबायोलॉजी विभागचे प्रधान वैज्ञानिक, युधवीर सिंह यांनी ही कॅप्सूल विकसीत करण्याऱ्या टीमचे सदस्य आहेत. त्यांनी सांगतिले की, वैज्ञानिकांची एक टीम पंधरा वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत आहेत. याचा काहीही दुष्परिणाम नाही. या कॅप्सुलमुळे काडीकचरा विघटीत होऊन खतामध्ये तयार होतात. संदर्भ – कृषी जागरण, ७ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1103
0