Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
19 Feb 18, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पेरू झाडाची छाटणी आणि खत व्यवस्थापन
पेरूच्या झाडाची छाटणी नियमित करावी लागत नाही पण झाडाला योग्य वळण देण्यासाठी झाडे लहान असताना छाटणी करून नवीन फुटवे वाढवून घेणे फायदेशीर ठरते झाडांची वाढ एकाच खोडावर होण्यासाठी अर्धा मीटर उंची पर्यंत येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. झाडाचा समतोल राखण्यासाठी ३-४ फांद्या ठराविक अंतरावर राखाव्यात.
खत व्यवस्थापन - झाडाची वाढ जलद व्हावी यासाठी पहिली ४ वर्षे खताच्या योग्य मात्र द्याव्यात • शेणखत २० ते २२ किलो प्रती झाड या प्रमाणे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच द्यावे • लागवडीनंतर ६ महिन्याने १५० ग्राम नत्र ५० ते ६० ग्राम स्फुरद,५० ग्राम पालाश द्यावे. • त्यानंतर पुढील वर्षापासून प्रतिझाड ८०० ग्राम नत्र ,४०० ग्राम स्फूरद,४०० ग्राम पालाश अशी खतमात्र २ ते ३ हप्त्यामध्ये विभागून द्यावी. पाणी व्यवस्थापन - पेरूचे झाड पाण्याचा ताण बराच काळ सहन करू शकते मात्रा नवीन लागवडीला साधारणपणे जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १५ दिवसाच्या अंतराने द्यावे बुंधा भोवती दुहेरी आळे करून बाहेरील अळ्यास पाणी द्यावे. उन्हाळ्यात १० ते १५ दिवसांनी व हिवाळ्यात २० दिवसांनी पाणी द्यावे झाडाच्या वाढीनुसार आल्याचे आकारमान वाढवावे. संदर्भ –अग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस १९ फेब्रु १८
69
1