Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Jul 19, 06:00 PM
पशुपालनwww.vetextension.com
दुधाळ जनावरांचे बाहय परजीवीपासून संरक्षण
बाहय परजीवी जनावरांच्या केस व त्वचेवर असतात. हे परजीवी जनावरांना हानी पोहचवतात. परजीवी स्वत:चे पोषण करून घेण्यासाठी जनावरांच्या त्वचेला चिकटून राहतात. बाहय परजीवीपासून होणारे नुकसान – या बाहय परजीवीच्या प्रसारामुळे त्वचा कोरडे पडते. त्वचेवरचे केस गळून जात असल्यामुळे जनावरांमध्ये रक्ताची कमी येऊन, जनावरे खाणे पिणे सोडते त्याचा परिणाम दुध उत्पादनावर होतो त्यामुळे उत्पादनात घट होते. उपाय – बाहय परजीवीचे प्रमाण व गंभीरता ओळखून पशु वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने औषधोपचार करावे. उपचारा वेळी घ्यायची काळजी – • जनावरांना औषध लावण्याच्या आधी त्यांना पाणी पाजून घ्यावे. • गोठ्यातील सर्व जनावरांना एकाच वेळी औषध लावून घ्यावे. • जनावरांच्या गोठ्यात परजीवीच्या नियंत्रणासाठी औषधाची फवारणी करून घ्यावी. संदर्भ : www.vetextension.com
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
356
1