Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Oct 19, 06:30 PM
जैविक शेतीदैनिक जागरण
कंपोस्ट खत तयार करण्याची सोपी पद्धत
शेतकरी आपल्या शेतीमध्ये सोप्या पद्धतीने कंपोस्ट खत तयार करू शकतात. हे खत तयार करण्यासाठी शेतकऱ्याने ०.९ मीटर खोल, २.४ मीटर रुंद आणि स्वत:कडे उपलब्ध असलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेवर अवलंबून ५ मीटर लांब या आकाराचा खड्डा तयार करावा. ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे जास्त आहेत, ते या खड्ड्याचा आकारदेखील वाढवू शकतात. यानंतर शेणखत, मूत्र, भाजीपाला साली, पालापाचोळा तसेच खराब/सडलेले पदार्थ यांचे एकसारखे मिश्रण खड्ड्यामध्ये पसरवून टाका.
या शेणखताचे मिश्रण चांगले ओले नसल्यास, पुरेसे पाणी शिंपडून ओले करून घ्यावे. यानंतर शेणखत व उर्वरित मिश्र पदार्थ सम प्रमाणात पसरवून,ssss त्यावर ३० सेंटीमीटर मातीचा थर देऊन हा खड्डा ६ महिन्यासाठी आहे असा सोडावा. ६ महिन्यानंतर आपण पाहू शकता, या सर्व सेंद्रिय पदार्थांपासून उपयुक्त असे कंपोस्ट खत तयार झालेले असेल. ज्यामध्ये नायट्रोजन ०.३२ ते ०.५०%, फॉस्फरस ०.१० ते ०.२५%, पोटॅशिअम ०.२५ ते ०.४०%, कॅल्शिअम ०.८० ते १.२०%, मॅग्नेशिअम ०.३३ ते ०.७०% आणि झिंक ०.०४० इत्यादी अन्नद्रव्ये तयार होतात. संदर्भ :- दैनिक जागरण जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
501
2