Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Dec 19, 06:30 PM
पशुपालनकृषी जागरण
नवजात वासरांच्या संभाव्य रोगांना प्रतिबंध
जनावरांच्या नवजात वासरांची काळजी घेणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे. त्यांना बहुधा जन्मानंतर काही महिन्यांपर्यंत रोग होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच, जन्मानंतर काही महिने त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. छोट्या वासरांचे कोण कोणत्या रोगांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे ते खालीलप्रमाणे दिले आहे.
१) अतिसार (हगवण) लहान वासरांमध्ये दुधाचे अत्यधिक सेवन, पोटाचा संसर्ग, पोटातील किड्यांमुळे सर्वात जास्त अतिसार होण्याची शक्यता असल्याने त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. अतिसाराचा हा आजार जनावरांसाठी धोकादायक आहे आणि त्यातून जनावरे मरण्याची शक्यता असते. खबरदारी आणि उपचार: लहान वासरांना योग्य प्रमाणात दुधाचे सेवन करू द्यावे. अतिसार समस्या झाल्यास पशुवैदयांशी संपर्क साधावा. २) पोटात जंत होणे: गाय-म्हशीच्या वासरांमध्ये हा आजार होण्याची संभावना असते. पोटातील जंतांमुळे वासरे दुर्बल होऊ लागतात तसेच अतिसार किंवा बद्धकोष्ठता येते. खबरदारी आणि उपचार: या आजाराच्या उपचारासाठी पिपरझिन नावाचे औषध योग्य आहे. त्याचबरोबर, गर्भावस्थेच्या शेवटच्या काळात गाय आणि म्हशींना जंत मरण्याचे औषध द्यावे. ६ महिन्यांपर्यंत प्रत्येक दीड - दोन महिन्यांमधून एकदा पिपरझिन लिक्विड किंवा गोळी देणे आवश्यक आहे. ३) नाळ रोग: नवजात वासराच्या नाळीमध्ये संसर्गजन्य रोग होण्याचा धोका जास्त असतो. संसर्गामुळे नाळेवर सूज येते. खबरदारी आणि उपचार: अशी समस्या वासरांमध्ये दिसताच जवळच्या पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा. संदर्भ: कृषी जागरण जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
165
0