Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Dec 18, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडीतील कीड व्यवस्थापन
सध्या, बहुतांशी शेतकऱ्यांनी भेंडीच्या काढणीला सुरुवात केलेली आहे. भेंडीच्या पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या कीटक, किडींच्यावर योग्य उपाययोजना करून भरघोस उत्पादन मिळवता येते. मावा किडी, तुडतुडे, पांढरी माशी आणि शेंडा तसेच फळे पोखरणारी अळी हे या पिकाचे नुकसान करणारे मुख्य कीटक आहेत. एकात्मिक कीटकनाशक व्यवस्थापन पद्धती (IPM) - • शेतात पिवळे चिकट सापळे लावा. • प्रादुर्भावाच्या सुरूवातीला, निंबोळी तेल 50 मिली किंवा लसणाचा अर्क (500 ग्रॅम) किंवा निंबोळीवर आधारित द्रव @10 ते 40 मिली किंवा व्हर्टीसिलीयम लेकानी, बुरशीवर आधारित पावडर @40 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फवारा. • पिवळया शिरांच्या मोझाईक विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो. अशी प्रादुर्भावग्रस्त रोपे ठराविक काळाने उपटून काढून टाका. • रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी, इमिडाक्लोप्रीड 70 WG @ 2 ग्रॅम किंवा थियामेथॉक्झाम 25 डब्ल्यूजी @ 3 ग्रॅम किंवा टोलफेनपायरॅड 15 ई सी @ 20 मिली किंवा डिनोटोफ़्युरन 20 एसजी @ 4 ग्रॅम किंवा फ्लोनीकामिड 50 डब्ल्यूजी @4 ग्रॅम किंवा डायफेनथीयुरोन 50 डब्ल्यूपी 10 ग्रॅम किंवा स्पायरोमेसिफेन 240 एससी @8 मिली किंवा असेटामीप्रीड 20 एसपी @4 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
• शेंडा तसेच फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, क्लोरांट्रानिलीप्रोल 18.5 एससी @3 मिली किंवा लँबडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस @ 5 मिली किंवा पायरीडॅल 10 इसी @10 मिली किंवा पायरीप्रोक्सीफेन 5% + फेनप्रोपॅथ्रीन 15% EC @ 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा. • प्रादुर्भावग्रस्त शेंडे ठराविक काळाने तोडा आणि काढून टाका. • भेंडीची नियमित आणि वेळेवर काढणी करा. प्रादुर्भावग्रस्त भेंड्या अळ्यांसकट नष्ट करा. • लेडीबर्ड भुंगेरे, कोळी आणि क्रिसोपेरीया अशा परभक्ष्यांचे संवर्धन करा. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
241
88