Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Jan 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटयातील कटवर्ममुळे होणाऱ्या नुकसानीचे एकात्मिक व्यवस्थापन
बटाटा या पिकातील कटवर्म या अळीला हळूच स्पर्श केला, तर ते लगेच स्वत:भोवती वेटोळे करून बसतात. ही अळी दिवसा वनस्पतीभोवती असलेल्या मातीमध्ये लपतात,रात्रीच्या वेळी वनस्पतीचे खोडे कुरतडतात तसेच वनस्पतीचे कोवळी पाने व फांद्या खातात त्याचबरोबर या पिकामधील आतील भागदेखील खात असल्यामुळे बटाटयाच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होतो त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते.
एकात्मिक व्यवस्थापन – • या अळी रात्रीच्या वेळी पिकांचे नुकसान करते व दिवसा गवतामध्ये लपतात म्हणून संध्याकाळच्या वेळी त्यांना गोळा करून नष्ट करावे. • लपलेल्या अळीला बाहेर काढण्यासाठी पिकांना पाणी द्या,त्यामुळे ते बाहेर आल्यावर परभक्षी पक्ष्यांचे खाद्य होतात. • बटाटा लागवडीपूर्वी खोलगट नांगरट करावी. • बटाटा पिकाच्या काढणीनंतर लगेच भाजीपाला पिकांची लागवड करू नये,त्याऐवजी बाजारा,एरंड व कपाशीसारखी पिके घ्यावीत. • संध्याकाळच्यावेळी क्लोरोपायरीफॉस २०% ईसी २ लि अधिक १००० लि पाण्याच्या सरीमध्ये कीटकनाशकाची आळवणी करावी, त्याचबरोबर कीटकनाशकाची पिकांवर देखील फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
265
29