Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Aug 18, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
संत्राचा मृग बहार येण्याकरता उपाय योजना
1. नवीन संत्रा लागवड करायची असल्यास उत्तम निचरा होणारी जमीन व चुनखडीचे प्रमाण १० टक्के पेक्षा कमी असलेल्या जमिनीत संत्रा लागवड करावी.जर चुनखडीचे प्रमाण अधिक असल्यास जिप्सम चा वापर करावा. 2. संत्र बागेला मृगबहार येण्यासाठी पाण्याच्या ताणाचा कालावधी हा जमिनीच्या मगदुरावर अवलंबून असतो.मध्यम पोताच्या जमिनीत लागवड केलेल्या बागेला ५० दिवसाचा ताण मृगबहार घेण्यास योग्य असतो. हलक्या जमिनीमध्ये २५ ते ३० दिवसाचा ताणसुद्धा पुरेसा असतो. 3. मृग बहारासाठी खत व्यवस्थापन महत्वाचे असते ३० ते ३५ किलो शेणखत प्रती झाडास द्यावे. ताण तोडते वेळेस ५०० ग्राम नत्र ,३०० ग्राम स्फुरद, ३०० ग्राम पालाश त्याबरोबर ५ किलो निंबोळी पेंड, १५० ग्राम झिंक सल्फेट प्रती झाड द्यावे.
4. मृगबहाराची फुले येण्यासाठी संत्राबागेत जून-जुलै मध्ये भरपूर ओलावा असणे आवश्यक आहे तसेच या कालावधीत ठिबक सिंचन ने केलेले ओलीत अधिक फायदेशीर ठरते. 5. मृगबहार घेण्याकरता संजीवकांचा उपयोग महत्वाचा आहे. संत्रा झाडाची वाढ थांबण्याकरिता १००० पीपीम सायकोसील या वाढरोधक संजीवकाची फवारणी घ्यावी. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
101
8