Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Apr 18, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकांसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्यांचे कार्य
पिकांच्या परिपूर्ण वाढीसाठी ५० पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात लागणाऱ्या अन्नद्रव्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून ओळखले जाते. १. झिंक - ऑक्झीनच्या निर्मिती मध्ये गरजेचे अन्नद्रव्यप्रामुख्याने इंडॉल अॅसिटिक अॅसिडच्या निर्मितीत सहकार्य करते. त्यामुळे पिकांच्या शेंद्याची वाढ जोमदार होण्यास मदत होते प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या संजिवकाची निर्मिती करते. पिकांमधील शर्काराच्या वापरासाठी गरजेचे आहे.झिंक पिकांमध्ये स्टार्च तयार करण्यासाठी आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे.झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करण्यासाठी आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे. २. फेरस - हरित लवक निर्मितीत आणि हरित लवकाच्या कार्यात गरजेचे पिकांतर्गत उर्जेच्या वहनासाठी आवश्यक काही संजीवके व प्रथिनांचा घटक पिकांतर्गत अन्नानिर्मितीसाठी आणि चयापचानाच्या क्रियेत गरजेचे आहे.सहजीवी नत्र स्थिरीकरणासाठी क्रियेत गरजेचे आहे. ३. बोरॉन - बोरॉन हे पिकामध्ये शर्करा आणि स्टार्च यांचे संतुलन साधते.पिकातील शर्काराच्या आणि कार्बोदकाच्या वहनात गरजेचे आहे.परागीभवन व बीज निर्मितीत गरजेचे आहे.नियमित पेशी विभाजन नत्राच्या चयापचनात ,नियमित पेशी भित्तिका तयार व पिकांतर्गत जल व्यवस्थापनसाठी बोरॉन गरजेचे आहे. ४. मँगनीज - प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बनडायऑक्सिडचे रुपांतर शर्करे मध्ये होण्यास कार्य करते.मॅगनीज हरितलवक निर्मितीत आणि नायट्रेट एकत्रीकरणामध्ये कार्य करते . मँगनीज स्निग्ध पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेत गरजेच्या संजीवकाच्या कार्यशिलतेसाठी मँगनीजची गरज असते.
५. कॉपर - कॉपर पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेत आणि श्वसनाच्या क्रियेत उत्तेजन म्हणून कार्य करते. अमिनो अॅसिडचे रुपांतर प्रोटीन मध्ये करणाऱ्या संजीवकांचा घटक आहे. कॉपर हे कर्बोदके प्रथिनांच्या पचनात गरजेचे आहे. पिकाच्या पेशीला ताकद आणि सुरक्षा प्रदान करणाऱ्या लीग्निनच्या निर्मितीसाठी कॉपर अत्यंत गरजेचे आहे.फळांच्या टिकाऊ क्षमतेवर चव आणि शर्करेच्या प्रमाणावर देखील कॉपर नियंत्रण करते. ६. मॉलीबडेनम - मॉलीबडेनम पिकामध्ये नायट्रेटसचे रुपांतर अमिनोअॅसिड मध्ये होण्यास कार्य करते सहजीवी नत्र स्थिरीकरणामध्ये गरजेचे आहे. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
118
4