Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Jul 18, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पावसाळ्यात लावलेल्या भेंडीत शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
ठिपकेदार बोंडअळी आणि हेलिकोव्हर्पा अळीचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात लावलेल्या भेंडीपेक्षा पावसाळ्यात लावलेल्या भेंडीत जास्त असतो. दोन्ही प्रकारच्या अळया या पिकाच्या शेंड्याचे आणि फळांचे नुकसान करतात. एकात्मिक व्यवस्थापन: • प्रादुर्भावाच्या सुरूवातीला, निंबोळी तेल 50 मिली किंवा निंबोळीवर आधारित द्रव 20 मिली(1 EC) ते 40 मिली (0.15 EC0 किंवा व्हर्टीसिलीयम लेकानी, बुरशीवर आधारित पावडर 40 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फवारा. 10 दिवसांच्या अंतराने तेच पुन्हा फवारा. • प्रौढ अळ्यांची संख्या कमी करण्यासाठी ठिपकेदार बोंडअळी /हेलिकोव्हर्पा कामगंध सापळे @40 प्रती हेक्टर बसवा. • आतील अळी मारण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त शेंडे बोटाने दाबा किंवा प्रादुर्भावग्रस्त शेंडे गोळा करून नष्ट करा. • पिकाची नियमित काढणी करा.
• काढणीच्या वेळी, प्रादुर्भावग्रस्त फळे वेगळी करा आणि प्राण्यांना खायला घाला. जास्त पिकलेली फळे झाडांवर तशीच राहू देऊ नका. • बॅसिलस थुरीनजिएन्सिस, ही जीवाणू पावडर 20 ग्रॅम किंवा बी. बॅसियाना ही विषाणूवर आधारित पावडर 40 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फवारा. • एक एकर क्षेत्रासाठी HaNPV (न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस विषाणू) 250 LE 500 लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळी फवारा. • जर प्रादुर्भाव वाढत असेल तर फेनव्हलेरेट 20 EC 10 मिली किंवा क्लोरांट्रानिलीप्रोल 20 SC 3 मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5 WG 5 ग्रॅम किंवा सिंट्रानिलीप्रोल 10 OD 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1% + ट्रायझोफॉस 35% EC 10 मि.ली. किंवा सायपरमेथ्रीन 10 EC 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 EC 10 मिली किंवा लँबडा सायहॅलोथ्रीन 4.9 CS 5 मिली किंवा पायरीडयाल 10 EC 10 मिली किंवा फेनोब्युकार्ब 50 EC 4 मिली किंवा क़्विनालफॉस 25 EC 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारा. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
87
5