Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Jul 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील पिवळ्या खोड किडीचे व्यवस्थापन -
भारतात सर्व राज्यांसाठी भात हे मुख्य पीक आहे. या पिकास उष्ण आणि आर्द्रतायुक्त हवामान गरजेचे असते. ज्या प्रदेशांत जास्त आर्द्रता, दीर्घकाळापर्यंत सूर्यप्रकाश आणि पाण्याची खात्री असते, यांसाठी हे पीक अनुकूल आहे. पिकाच्या संपूर्ण पीक कालावधीमध्ये सरासरी २१ ते ३७ डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान आवश्यक असते. पिकामध्ये अंकुरण होण्यासाठी १० डिग्री सेल्सिअस तापमान गरजेचे असते, परंतु पिकाच्या वाढीसाठी कमाल ४० ते ४० डिग्री सेल्सिअस तापमान सहन करू शकते.
● लवकर पुनर्लागवड - जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. ● ३ ते ४ भागांमध्ये विभागून नत्रयुक्त खतांचा वापर करावा. ● रोपवाटिकेत, क्लोरोपायरीफॉस ०.४% जीआर किंवा कार्बोफ्युरॉन ३% जी किंवा कार्टाप हायड्रोक्लोराईड ४% जी किंवा फिप्रोनील ०.३% जीआर @ १ किलो प्रति १०० चौ.मी (१ गुंठा), बियाणे पेरणीनंतर १५ दिवसांनी वाळू मिश्रित द्यावे. ● पिवळी खोड किडीच्या, अळी अवस्थेत असलेल्या नियंत्रणासाठी दाणेदार कीटकनाशन हे प्रभावीपणे काम करते. ● भात पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव दिसताच किंवा रोपांचे पुनर्लागवड झाल्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी क्लोरोपायरीफॉस ०.४% जीआर @१० किलो किंवा कार्टाप हायड्रोक्लोराईड ४% जी @१० किलो किंवा फिप्रोनील ०.३% जीआर @२०-२५ किलो प्रति हेक्टरी द्यावे. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी पुन्हा द्यावे. तसेच पुढील फवारणी देखील करून घ्यावी. ● प्रादुर्भाव झालेल्या भागांत या कीटकनाशकाचा वापर करावा. क्लोरोपायरीफॉस १८.५% एससी @३ मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड ४८० एससी @३ मिली किंवा फिप्रोनील ८०% डब्ल्यूजी @१ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड २०% डब्ल्यूजी @२.५ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ४% + ब्युप्रोफेनझिन २०% एससी @१० मिली प्रति १० लिटर पाण्याच्या प्रमाणाने फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
189
13