Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Oct 18, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाताच्या पानांवरील हॉपर्सचे व्यवस्थापन
हिरव्या, तपकिरी आणि पांढऱ्या पाठीची हॉपर्स भातशेतीसाठी नुकसानकारक आहेत. नर आणि मादी दोघेही झाडांमधून पेशीचा रस शोषून घेतात. उपद्रव झालेली झाडे पिवळसर किंवा तपकिरी दिसतात आणि कोरडी पडतात. जास्त प्रादुर्भाव झालेली झाडे भाजलेली दिसतात, याला "हॉपर बर्न" असे म्हणतात. शेतामध्ये वर्तृळाकार मार्गाने उपद्रव वाढत जातो आणि "हॉपर बर्न" म्हणून ओळखली जाणारी जळती पिके दिसतात. प्रादुर्भाव झालेल्या वनस्पतींमध्ये कणसाच्या ओंब्यांमध्ये धान्य अपरिपक्व राहते आणि म्हणून उत्पादन कमी होते. एका आठवड्यात, संपूर्ण शेतात याचा प्रादुर्भाव होतो.
व्यवस्थापन: o शिफारस केलेल्या नायट्रोजन खतांचा वापर तीन घटकांमध्ये करावे. o कीटकनाशक वापरल्या नंतर पाणी काढून टाकावे. o सुरुवातीस प्रादुर्भाव काही ठराविक ठिकाणी तसाच राहतो म्हणून नियमित देखरेख करावी. फक्त त्या जागेवर कीटकनाशके वापरावीत आणि खर्च कमी करावा. o कार्बोफुरन ३ जी किंवा फिपरोनिल ०.३ जीआर २०-२५ किलो किंवा फॉरेट १० जी १० किलो किंवा क्लोरंट्रानिलिप्रोल ०.५ % आणि थिएमथॉक्सम १% जीआर ६ किलो प्रति हेक्टर जमिनीत वापरावे. o नंतरच्या टप्प्यात, ग्रॅन्युलर कीटकनाशकांचा वापर शक्य नसेल तर ७५ एसपी १० ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली किंवा ब्युप्रोफेझिन २५ एससी २० मिली किंवा फाइप्रोनिल ५ एससी २० मिली किंवा किंवा फेनोब्यूकरब ५० ईसी २० मिली किंवा थिअमॅथॉक्सॅम २५ डब्लूजी २ ग्रॅम किंवा लैम्ब्डा सैहेलोथ्रीन २.५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारावे. o या कीटकनाशकांचा उपयोग करून, देठात पोकळी पडणे आणि पानांचे दुमडणे देखील नियंत्रित केले जाते. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
181
8