Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Aug 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकांमधील तुडतुडे किडींचे नियंत्रण
भात पिकांवर प्रामुख्याने हिरवे तुडतुडे, तपकिरी तुडतुडे आणि पांढऱ्या पाठीचे तुडतुडे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडींचे पिल्ले आणि प्रौढ पतंग हे पिकांमधील रस शोषण करतात. या कारणामुळे ज्याठिकाणी प्रादुर्भाव झाला आहे, तेथील पाने जळाल्यासारखी दिसतात. एकात्मिक कीड व्यवस्थापन: • रोपांची पुर्नलागवड लवकर केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. • नायट्रोजनयुक्त खतांची शिफारस केलेली मात्रा तीन टप्प्यांमध्ये विभागून द्यावी. • पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच, पाण्याचा निचरा होण्याचे नियोजन करावे. • कार्बोफ्युरॉन ३ जी @२५ किलो किंवा फिप्रोनील ०.३ जीआर @२० - २५ किलो किंवा क्लोरँट्रेनिलिप्रोल ०.५% + थायमेथॉक्साम १% जीआर @६ किलो प्रति एकर जमिनीद्वारे द्यावे. • जर दाणेदार कीटकनाशकांचा वापर करणे शक्य न झाल्यास, असेटामाप्रिड २० एसपी @४ ग्रॅम किंवा क्लोथीनिडीन ५० डब्ल्यूजी @५ ग्रॅम किंवा ब्युप्रोफेंझिन २५ एससी @२० मिली किंवा डायनोटेफ्युरॉन एसजी @४ ग्रॅम किंवा ब्युप्रोफेंझिन १५% + असिफेट ३५% डब्ल्यूपी @२५ ग्रॅम किंवा डेल्टामेथ्रीन ०.७२% + ब्युप्रोफेंझिन ५.६५% ईसी @२० मिली किंवा फेनोब्यूकार्ब २०% + ब्युप्रोफेंझिन ५% @ २० मिली किंवा फ्ल्यूबेंडामाईड ४% + ब्युप्रोफेंझिन २०% ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्याच्या प्रमाणाने फवारणी करावी. कीटकनाशकाची फवारणी करतेवेळी नोझल खोडाच्या दिशेने असावा. या फवारणीमुळे भात पिकातील पाने गुंडाळणारी कीड व खोड किडींचे देखील नियंत्रण होते. प्रादुर्भाव दिसून येताच, कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी.
डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
248
11