Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 Sep 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
खरीप हंगामातल्या 2019-20 मधील प्रमुख पिकांचा अंदाज
नवी दिल्ली: यंदाच्या म्हणजेच वर्ष 2019-20 मधल्या खरीप पिकांचा प्राथमिक अंदाज कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केला. आत्तापर्यंत विविध राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारावर हा प्राथमिक अंदाज तयार करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार देशात यंदा अन्नधान्याचे एकूण उत्पादन 140.57 दशलक्ष टन एवढे होईल. यामध्ये तांदूळ 100.35 दशलक्ष टन, पोषक कडधान्य 32 दशलक्ष टन, डाळी- 8.23 दशलक्ष टन, तूर- 3.54 दशलक्ष टन, मका- 19.89 दशलक्ष टन अशा विविध धान्यांचा समावेश आहे.
तेलबियांचे एकूण उत्पादन 22.39 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. यात सोयाबीन- 13.50 आणि शेंगदाणे 6.31 दशलक्ष टन असेल. कापसाचे उत्पादन यंदा 32.27 दशलक्ष टन इतके होईल, तर तागाचे उत्पादन 9.96 दशलक्ष टन इतके होईल. या खरीप हंगामात ऊसाचे उत्पादन 377.77 दशलक्ष टन इतके होण्याचा अंदाज आहे. आत्तापर्यंतच्या मोसमी पावसाची आकडेवारी लक्षात घेतली असता सप्टेंबर मध्यापर्यंत देशभरात सरासरीपेक्षा 4 टक्के अधिक पाऊस झाला आहे. संदर्भ – कृषी जागरण, 25 सप्टेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
101
0