Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Nov 19, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाजीपाला पिकांची निरोगी रोपे कशी तयार करावी?
- भाजीपाला पिकांमध्ये दर्जेदार व निरोगी रोपांच्या निर्मितीसाठी व उत्पादन वाढीसाठी योग्य रोपवाटिका तयार करणे गरजेचे आहे. - ज्या ठिकाणी आपल्याला शेडनेट तसेच कोकोपीट, प्लास्टिक ट्रे उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी शेतामध्ये योग्य जागा निवडून गादी वाफे तयार करावे. - जागा निवडताना उंच वाढलेल्या झाडाच्या खाली अथवा बांधाच्या कडेला किंवा एकदम पाणथळ जागा नसेल याची काळजी घ्यावी.
- बियाणे टाकल्या नंतर झाऱ्याच्या अथवा पंपाच्या साहाय्याने गादीवाफ्यावर पाणी द्यावे. मोकाट पाणी गादी वाफ्यावर सोडू नये अन्यथा बियाणे पाण्या बरोबर वाहून जाण्याची शक्यता असते. त्यानंतर त्यावर दोन दिवस सुतुळीचे पोते ओले करून टाकावे व त्यावरच पंपाच्या साहाय्याने पाणी शिंपडावे. पोते टाकल्यामुळे दमट वातावरण तयार होऊन बियाणे लवकर उगवण्यास मदत होईल. - पिकानुसार उदा. मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी यांसारख्या पिकांचे बियाणे ८ ते १० दिवसांत बियाणे उगवून येते. - बियाणे उगवल्यानंतर सुरुवातीला काही कीड रोग यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एक आठवड्यात त्यावर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम/लिटर अथवा मॅंकोझेब २ ग्रॅम/लिटर अथवा कॉपर ऑक्सि क्लोराईड २ ग्रॅम/लिटर यांसारखे बुरशीनाशक व थायोमीथोक्साम ०.२५ ग्रॅम/लिटर किंवा इमिडाक्लोप्रिड ०.२५ ग्रॅम/लिटर यांसारख्या कीटकनाशकाची फवारणी करावी. - त्याचबरोबर रोपांची जोमदार वाढीसाठी व जैविक व अजैविक ताण याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी सिलिकॉन १ मिली/लिटर तसेच सशक्त रोप बनण्यासाठी चिलेटेड कॅशिअम @ १० ग्रॅम प्रति पंप घेऊन फवारणी करावी. - पुनर्लागवडीसाठी योग्य वयाची रोपे निवडावी जसे की मिरची ३५ दिवस, टोमॅटो २५ दिवस, काकडी/कलिंगड १८ दिवस. कोणत्याही पिकाची चांगली वाढ, उत्पादन आणि सशक्तपणा असण्यासाठी चांगल्या प्रतीची रोपे निवडणे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे वरील गोष्टींचा बारकाईने विचार आणि अंतर्भाव करणे फायदेशीर होईल. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
151
1