Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Jul 18, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व त्यांचे फायदे
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे ज्या सर्वप्रकारच्या स्त्रोतांपासून अन्नद्रव्ये उपलब्ध होतात उदा. रासायनिक व जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीचे पीक, पीकपद्धती व द्विदल पिकांचा वापर करून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवून व जमिनीची सुपीकता टिकवून पीक उत्पादनात वाढ करणे होय. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे फायदे 1.पिकांना संतुलित अन्नद्रव्य पुरवठा करता येतो. 2.संतुलित खतांमुळे पिकांच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक उत्पादनात वाढ होते. 3.सेंद्रिय व जैविक खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपरोगिता वाढते. 4.पीकपद्धतीत पहिल्या पिकास वापरलेल्या सेंद्रिय खतांचा वापर पुढील पिकासही उपयुक्त ठरतो.
5.जमिनीच्या भौतिक गुणधर्मात (उदा. पाणी धरून ठेवणे, हवा खेळती ठेवणे,जमीन भुसभुशीत करणे इत्यादी) 6.रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपयोगिता वाढते. 7.अविद्राव्य अन्नद्रव्यांचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होते व स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची उपलब्धता वाढविता येते, तर नत्राची उपलब्धता आवश्यक तेवढीच ठेवता येते. 8.जमिनीची जलधारणा शक्ती, जैवरासायनिक प्रकियांचा समतोल राखला जातो. 9.उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. 10.जमिनीतील कर्ब नत्र यांच्या प्रमाणात समतोल राखला जातो. 11.योग्य पीक फेरपालटीचा व आंतरपीक पद्धतीचा पुढील पिकांस अन्नद्रव्यांची उपलब्धता विशेषतः नत्राची उपलब्धता वाढविण्यास मदत होते. 12.पीक अवशेषाचा जमिनीत प्रथम आच्छादन आणि नंतर सेंद्रिय खत म्हणून वापर केल्यास जल व मृदसंधारण तसेच अन्नद्रव्ये संधारणही करता येते. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस १२ जुलै १८
196
2