Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Nov 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक कीड नियंत्रण
तूर हे भारतात उत्पादित केले जाणारे सर्वात लोकप्रिय कडधान्य पीक आहे. या पिकाची मका किंवा कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून देखील अनेक भागात लागवड केली जाते. जर पीक वाढीच्या अवस्थेत पिकाची योग्य काळजी घेतली गेली नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. वेगवेगळ्या अळ्या व्यतिरिक्त मावा, वाळवी, पिठ्या ढेकूण, तुडतुडे, कोळी, शेंग पोखरणारा किडा इत्यादी किडीदेखील या पिकामध्ये आढळतात. शेंगा पोखरणाऱ्या अळी बरोबरच शेंग माशी, ब्लू बटरफ्लाय, प्ल्युम मॉथ, ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी हे फुलांच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. उशीरा पक्व होणाऱ्या वाणांमध्ये शेंग माशी आणि शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वारंवार होतो. सर्वसाधारणपणे, गुच्छांमध्ये येणाऱ्या तूर वाणांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. ही अळी शेंगेला छिद्र पडून आतील कोवळे बियाणे खाऊन शेंगांमध्ये प्रवेश करते. शेंग माशीदेखील शेंगामध्ये प्रवेश करून आत पोचेते. सुरुवातीला, प्लम मॉथ लार्वा शेंगाच्या बाह्यत्वचा भाग खारवडतो आणि नंतर शेंगात प्रवेश करून आतील भाग खातो.
एकात्मिक कीड नियंत्रण:- • या किडी शेताच्या बांधावरील तणांवर वाढत असल्याने तणांचे नियंत्रण करावे. • शेंग पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव नॉन-बंच (विखुरलेल्या शेंगा) तुरीच्या जातींमध्ये कमी प्रमाणात आढळतो. • मका हे पीक आंतरपीक म्हणून लागवड केल्यास, तूर पिकामध्ये हा प्रादुर्भाव कमी होतो. • पीक फुलधारणा अवस्थेत असताना शेंग पोखरणाऱ्या अळीचा (हेलिकॉर्पा) प्रादुर्भाव तपासण्यासाठी सापळे बसवावे आणि पुरेसे पतंग आढळल्यास सापळ्यांची संख्या वाढवावी. • वीज सुविधा असल्यास शेतात एक हलका प्रकाश सापळा स्थापित करा. • पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच, निंबोळी पावडर (५%) @५०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • एचएएनपीव्ही @ २५० एलई प्रति हेक्टर फवारणी करा. • बॅसिलस थुरिंजेनेसिस (बीटी) पावडर @ १५ ग्रॅम किंवा बव्हेरिया बॅसियाना बुरशीजन्य पावडर @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • शेतात अधिकाधिक परभक्षी पक्ष्यांना आकर्षित करण्याची योजना करावी. पिकामध्ये ५०% फुलधारणा झाल्यास, असिफेट ७५ एसपी @ १५ ग्रॅम किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी @३ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी @४ मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी @२० ग्रॅम किंवा क्लो क्लोरँट्रेनिलीपोल १८.५ एससी @३ मिली किंवा फ्लूबेन्डामाईड ४८० एससी @३ मिली किंवा स्पिनोसॅड ४५ एससी @४ मिली किंवा डेल्टामेथ्रिन १% + ट्रायझोफॉस ३५% ईसी @१० मिली किंवा फ्लूबेन्डामाईड २० डब्ल्यूजी @५ ग्रॅम किंवा क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रिन ५ ईसी @१० मिली किंवा प्रोफेनोफॉस ४०% + सायपरमेथ्रीन ४% ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच प्रत्येक फवारणीवेळी कीटकनाशक बदलावे. • भाजीच्या उद्देशाने घेतलेल्या तूर पिकामध्ये मोनोक्रोटोफॉस फवारणी करु नका. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
78
0