Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Oct 18, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सुधारित तंत्रज्ञानातून वाढवा सूर्यफुलाचे उत्पादन
1) सूर्यफुलासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व 6.5 ते आठपर्यंत सामू असणारी जमीन योग्य असते. चोपण जमिनीत सूर्यफुलाच्या उगवणीस अडचण येते. 2) सूर्यफुलाच्या मुळ्या 60 सें.मी.पेक्षा खोल जाऊन अन्नद्रव्ये शोषण करत असल्याने पेरणीपूर्वी एक नांगरणी करून, दोन वखराच्या पाळ्या देऊन रान भुसभुशीत तयार करावे. जमिनीचा मगदूर व त्यातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले राखून ओलावा टिकवून ठेवणे, शेवटच्या वखराच्या पाळीआधी आठ ते दहा टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. 3) पेरणीपूर्वी तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाण्यास लावावे. पिकास नत्र व स्फुरदाची उपलब्धता वाढविण्यासाठी अॅझोटोबॅक्‍टर व पी.एस.बी. प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 4) संकरित सूर्यफुलाचे वाण हे सुधारित वाणापेक्षा अधिक प्रमाणात रासायनिक खतास प्रतिसाद देत असल्याने त्यास एकरी ५० किलो युरिया, ४० किलो १०:२६:२६ द्यावे.
5) युरियाचा दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी द्यावा. 6 माती परीक्षणाच्या अहवालानुसार गरज भासल्यास एकरी ३-४ किलो झिंक सल्फेट, 10 ते १२ किलो मॅग्नेशिअम सल्फेट पेरणीच्या वेळी द्यावे. याच वेळी १० किलो गंधक प्रति एकरी दिल्यास 1.5 ते 2.5 टक्‍क्‍यांपर्यंत तेलाचे प्रमाण वाढते. 7) पिकास 20, 40 व 50 दिवसांनी १९:१९:१९ ची पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास उत्पादनात वाढ होते. 8) सूर्यफूल पिकात रोपांची संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. शेतकरी पाभरीने पेरणी करीत असल्याने रोपांची संख्या कमी किंवा अधिक होऊन उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. हे टाळण्याकरिता उगवणीनंतर 15 दिवसांनी विरळणी करावी. दोन रोपांतील अंतर किमान 30 सें.मी. ठेवावे. पेरणीनंतर ३०-३५ व्या दिवसानंतर खुरपणी करावी. 9) सूर्यफुलास कळीच्या, फूल उमलण्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत पुरेसे पाणी दिल्याने उत्पादनात वाढ होते. अग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस ४ ऑक्टो १८
139
1