Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Sep 19, 06:30 PM
पशुपालनNDDB
मान्सूननंतर पशुसंवर्धनाबद्दल घ्यावी ‘अशी’ काळजी
• मान्सूनचा चांगला पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या शेडमध्ये पाणी साचल्याने जनावरांना आजार होण्याची दाट शक्यता आहे; म्हणूनच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची काळजी घेतली पाहिजे. • गुरांना कोरड्या व उंच ठिकाणी बांधावे. • कोरडे व उंच ठिकाणी चारा व्यवस्थित साठवावा. • गुरांच्या शेड स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. वेळोवेळी छत आणि भिंतींवर चुनखडीचे द्रावण फवारणी करावी. • वातावरणीय तापमानात होणाऱ्या चढ-उतारांपासून गुरांना संरक्षण देण्यासाठी खास उपाय करावे. • परजीवी कीटकांपासून जनावरांचे संरक्षण करावे. जेव्हा जनावरे माजावर येतात त्यानंतर साधारणतः १२ ते १८ तासांत कृत्रिम रेतन करावे. • या हंगामात हिरव्या चाराच्या जादा उपलब्धतेमुळे जनावरांच्या जास्त प्रमाणात चारा खाण्याशी संबंधित अडचणी टाळण्यासाठी, जनावरांना खुल्या ठिकाणी चरायला पाठवू नका. खनिज मिश्रण चाऱ्यासोबत द्यावे. • कोरडा चारा हिरव्या चाऱ्याबरोबर मिसळून खायला द्यावा. • या महिन्यात मेंढीची लोकर कातरण करावी. संदर्भ : एनडीडीबी आणि एफएओ
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
810
2