Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Nov 18, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी निर्यातीसाठी आवश्यक महत्वाच्या बाबी
• भेंडी नाजूक व हिरव्या रंगाची असावी . • भेंडी कीड व रोगाच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावी. • खराब किंवा डाग पडलेले पिवळी फळे निवडून वेगळी करावीत. • भेंडीची प्रतवारी करूनच निर्यातीसाठी पाठवावी . • भेंडीच्या निर्यातीसाठीव हवा खेळती राहण्यासाठी ज्यूटपासून तयार केलेल्या पिशाव्याचा वापर करावा.
• टिश्यू पेपरचा वापर फळे गुंडाळण्यासाठी करावा, म्हणजे बाष्पीभवनकमी होऊन भेंडीचा टिकाऊपणा वाढतो. • फळे तोडणी वेळी शक्यतो वातावरण थंड असावे ,भेंडी शक्यतो सकाळीच तोडावी. • निर्यातीसाठी भेंडीवर कीटकनाशके व बुरशीनाशकांचे अवशेष कमाल मर्यादा पातळीपेक्षा जास्त नसावे. • ज्या बुरशीनाशाकांवर किंवा कीटकनाशकावर बंदी घातली आहे अशी रसायने फवारणी साठी वापरू नये. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
545
21