Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Sep 19, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तणनाशक वापरताना घ्यायची काळजी
आजच्या काळात शेतकरी वर्गाला शेतातील पिकांमध्ये खुरपणीसाठी किंवा शेतीच्या इतर कामासाठी ग्रामीण भागात मजुरांची कमतरता जाणवते. पिकांमध्ये खुरपणीसाठी मजूर वेळेवर न मिळाल्यास, शेतकऱ्यांचा वेळेचे व आर्थिक नुकसान या दोन्ही गोष्टीना सामोरे जावे लागते. त्यामुळे बरेच शेतकरी हे खुरपणीऐवजी तणनाशकाची फवारणी करून तणांचे नियंत्रण करतात. तणनाशक फवारणी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी:
• कृषी केंद्रामधून तणनाशक खरेदी करताना मुदत संपलेली तणनाशक खरेदी करू नयेत. • विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके दिलेल्या मात्रेत वापरावी. • तणनाशकची फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असावा. • तणनाशके फवारलेल्या जमिनीत दरवर्षी कंपोस्ट, गांडूळखत या खतांचा वापर भरपूर करावा. • तणनाशकची फवारणी जोराचे वारे नसताना करावी तसेच २-३ तास सूर्यप्रकाश राहील हे पाहूनच फवारणी करावी. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
125
0