Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Apr 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
कांदा उत्पादकांसाठी आनंदाची गोष्ट
केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. यानुसार लवकरच विविध ठिकाणी कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. नाशिक: केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. यानुसार लवकरच विविध ठिकाणी कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना विक्रीचा पर्याय मिळावा, देशात कांदा विक्रीची समस्या निर्माण होऊ नये, भाववाढीनंतर कांद्याचे भाव संतुलित असावेत यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून नाफेडकडून कांदा खरेदी करण्यात येते. दरवर्षी होणाऱ्या खरेदीच्या तुलनेत ही सर्वांत मोठी कांदा खरेदी नाफेड करणार आहे. या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी होणार आहे. महाराष्ट्राबरोबर गुजरातमध्ये प्रथमच कांदा खरेदी होणार आहे. चालू वर्षी स्वामिनाथन आयोगाच्या भाव स्थिरीकरण निधीची सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याने खरेदीचा मार्ग सुकर झाला आहे. या वर्षी ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये ४५ हजार मेट्रिक टन कांदा महाराष्ट्रातून तर ५ हजार मेट्रिक टन कांदा गुजरातमधून खरेदी केला जाणार आहे.
गुणवत्तापूर्ण व टिकाऊ कांद्याच्या खरेदीसाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांची मदत घेतली जाणार आहे. नाफेडच्या अटीशर्ती नुसार कामकाज पार पडणार आहे. कांदा उत्पादक पट्ट्यात खरेदी व साठवणूक करण्यात येणार आहे. याकरिता व्यापारी, शेतकरी, इतर विभागांची साठवणगृहे भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्थेच्या अहवालानुसार देशात ५५ लाख मेट्रिक टन साठवण क्षमता उपलब्ध आहे. त्यामुळे साठवणूक प्रक्रियेतही अडचण येणार नसल्याचे चित्र आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ३ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
175
0