Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Nov 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
२०२२ पर्यंत देशातून ६० अरब डॉलर कृषी उत्पादन होणार निर्यात!
कृषी व प्रसंस्कृत खादय उत्पादन निर्यात प्राधिकरण (एपीडा) चे अध्यक्ष पवन कुमार बडकुमार यांनी सांगितले की, नवीन कृषी निर्यात कायदयानुसार २०२२ पर्यंत देशातून कृषी उत्पादनांच्या निर्यातीत ६० अरब डॉलर वाढ होणार असल्याची माहिती अकराव्या जैविक उत्पादनाच्या मेळाव्यात दिली.
बडकुमार म्हणाले, कृषी निर्यात कायदयामुळे वाणिज्य व कृषी मंत्रालयमधील अंतर कमी करण्यास मदत झाली. यामुळे २०२२ पर्यंत देशाचे कृषी उत्पादन निर्यात ६० अरब डॉलरपर्यंत होण्यासाठी काही समस्या निर्माण होणार नाही. सध्या कृषी निर्यात ३८ अरब डॉलर आहे. अकरावे जैविक उत्पादन मेळाव्यात विदेशी खरेदीदारांची रूची पाहता, भारतीय जैविक खादय उत्पादनांची मागणी वाढत आहे व लवकरच टेक्सटाइल व आयुर्वेदिकचेदेखील याच श्रेणीमध्ये समावेश केला जाईल. हा मेळावा ७ ते ९ नोव्हेंबरपर्यंत आहे. एपीडाचे महाप्रबंधक तरूण बजाज यांनी सांगितले की, चीन, दक्षिण कोरिया, व्हिटनाम, म्यानमार, बांग्लादेश, मॅक्सिको व युरोपीय संघातून आलेले विदेशी खरेदीदारांनी आपल्या देशात जैविक उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जैविक औषधांची रोपे, सौदर्य प्रसाधने, टेक्सटाइलपासून ज्वारीसारख्या अन्नधान्यापर्यंत भारतीय जैविक खादय उत्पादनांत त्यांनी रूची दाखविली आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ८ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
62
1