Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 Aug 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकांमधील उंदराचे प्रभावी नियंत्रण
परिचय : भाजीपाला, तेलबिया, तृणधान्ये इत्यादी बऱ्याच पिकांमध्ये सुरूवातीच्या टप्प्यावर उंदीर प्रादुर्भाव करून पीक दूषित करतात. ते मनुष्य आणि इतर प्राण्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य रोग जसे की, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस इत्यादी प्रसारित करून हानी पोहचवतात. पिकातील नुकसान आणि उपायाची माहिती खालील प्रमाणे दिली आहे. लक्षणे : उंदीर हे पिकांचे तसेच गोदामातील धान्यांचे देखील आतोनात नुकसान करतात. शेतातील बांधावर, पाण्याच्या पाटात व इतर ठिकाणी शेतीमध्ये बिळे आढळल्यास पिकांमध्ये उंदराचा प्रादुर्भाव आहे हे लक्षात येते. पिकांना मिळणारे पाणी बिळात झिरपून जमीन मशागतीचा खर्च वाढतो. बांधाची व पाटाची नेहमी दुरुस्ती करावी लागते. उंदराचा प्रादुर्भाव ऊस, गहू, हरभरा, हळद, आले, भात, भुईमूग इत्यादी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. नियंत्रण : कोणत्याही पिकामध्ये उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी विषमुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी विघटक सौम्य विष तसेच झिंक फॉसस्फाईड वापरावे. प्रथम १०० ग्रॅम पिठामध्ये ५ ग्रॅम तेल व ५ ग्रॅम गुळ मिसळून त्याचे गोळे तयार करावे. ते गोळे २ - ३ दिवस उंदराच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर टाकावे, त्यामुळे उंदरांना त्याची चटक लागते. त्यांनतर वरीलप्रमाणे गोळे करावेत, त्यात ३ ग्रॅम झिंक फॉस्फाईड टाकून, हातमोजे घालून किंवा काठीने मिश्रण करावे. पिठाचे गोळे करून उंदराच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर ठेवावे. जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील. संदर्भ-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
340
25