Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Nov 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
देशामध्ये केवळ १०० साखर कारखान्यात गाळपाला सुरूवात
नवी दिल्ली – ऊसाच्या गाळपाचा आरंभ होऊन दीड महिना झाल्यानंतरही आतापर्यंत देशभरात केवळ १०० साखर कारखान्यांमध्ये गाळपाची सुरूवात झाली आहे. जे की मागील वर्षी या कालावधीपर्यंत ३१० कारखान्यांमध्ये गाळपाला सुरूवात झाली होती. महाराष्ट्रात दुष्काळ व पुरामुळे ऊसाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे साखर कारखान्यांमध्ये गाळपाची सुरूवात झाली नाही.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ऑफच्या अनुसार, पहिल्या ऑक्टोबर २०१९ पासून सुरू होऊन चालू पेरणी हंगामात १५ नोव्हेंबरपर्यंत ४.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे की मागील वर्षी या कालावधीपर्यंत १३.३८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये चालू पेरणी हंगामात आतापर्यंत ६९ साखर कारखान्यांमध्ये गाळपाची सुरूवात झाली असून, राज्यात २.९३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी या राज्यात या कालावधीपर्यंत १.७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. कर्नाटकमध्ये चालू पेरणी हंगामात आतापर्यंत केवळ १८ साखर कारखान्यांमध्ये गाळपाची सुरूवात झाली होती. अन्य राज्यात उत्तराखंडमध्ये दोन साखर कारखान्यांमध्ये गाळपाची सुरूवात झाली आहे, बिहार दोन, हरियाणा एक, गुजरात तीन व तामिळनाडूमध्ये पाच कारखान्यामध्ये सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर या राज्यांमध्ये चालू पेरणी हंगामात १५ नोव्हेंबरपर्यंत ४९ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २० नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
86
0